29 April 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
x

जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम | मास्कवरून महापौरांचा टोला

Mumbai Mayor Kishori Pednekar, MNS chief Raj Thackeray, corona Mask

मुंबई, ०२ एप्रिल: कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.

दरम्यान, कोरोनाला टाळण्यासाठी मास्क वापरणं ही तर प्राथमिक गरज आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी गांभीर्यानं याकडे पाहिलं जात नसल्याचं दिसून येत आहे. अशा लोकांवर शंभर टक्के कारवाई केली जाईल, असं किशोरी पेडणेकर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून मास्क वापरणं टाळलं जात असल्याबाबत विचारला असताना किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली. राजकीय नेते जनतेचं प्रबोधन करत असतात पण या जीवघेण्या रोगाबाबत आता नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या जनतेच्या मतांच्या आधारावर आपण निवडून येतो त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि कार्यकर्त्याचं काम आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरुन स्वत:च्या फायद्याचं राजकारण करणं चुकीचं आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

News English Summary: The basic requirement is to use a mask to prevent corona. Although it is mandatory to wear a mask in public places in the city, it is not taken seriously in many places. One hundred percent action will be taken against such people, said Kishori Pednekar while interacting with media.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar indirectly criticized MNS chief Raj Thackeray stand over corona Mask news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x