7 May 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

राजकारणाचा कळस | कोरोना आपत्तीत चंद्रकांतदादांना राष्ट्रपती राजवटीची स्वप्नं | काय म्हणाले?

BJP, Chandrakant Patil, President rules, Maharashtra

पुणे, ८ एप्रिल: महाविकासआघाडी प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत म्हंटलं, येत्या १५ दिवसांत आणखी २-३ मंत्र्याचे राजीनामा होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. वाट पाहून आणखी कोणी कोर्टात जाईल. क्रिकेटच्या मॅचमध्ये पहिले दोन बॅट्समन आऊट व्हायला वेळ लागतो. अनिल परबांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असेल तर शपथा कसल्या घेताय? निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि सुप्रीम कोर्टात चौकशी होऊ नये म्हणून गेले. सर्वसामान्य माणूस सरकारच्या या प्रकाराला वैतागला आहे. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा असं त्यांनी सांगितले.

तसेच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. परंतु महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी काय राहिलंय. कोरोनात भ्रष्टाचार करणार. हप्ते वसुली करणार आणि केंद्राकडे बोट दाखवणार. केंद्राने काय काय दिलं हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय काय लागतं? याबाबत तज्ज्ञांनी सांगावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

 

News English Summary: If Mahavikasaghadi is going to hold the central government responsible for every problem, then why are they running the state. BJP state president Chandrakant Patil said that they should hand over the state to the Center. I am not saying that presidential rule should be implemented in Maharashtra. But now what is left for you not to implement the President’s rule, Chandrakant Patil asked the Thackeray government.

News English Title: BJP State president Chandrakant Patil again talked on President rules in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x