3 May 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

लसीकरण | फडणवीस पुन्हा संभ्रम निर्माण करत आहेत | राजेश टोपे काय म्हणाले तेच कळलं नाही?

Shortage, Corona vaccine, Maharashtra news updates

मुंबई, ८ एप्रिल: महाराष्ट्रात सध्या कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण तापलं आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचं आणि पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा सध्या शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे.

यासंदर्भात ट्विट करताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

मात्र इथे देखील फडणवीस आकड्यातुन संभ्रम निर्माण करत आहेत का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. ६ एप्रिलची महाराष्ट्र DGIPR;चं ट्विट करताना त्यांनी ९१ लाख लसी वापरल्याचं म्हटलं आहे. यावेळी भारत सरकारच्या आकडेवारीचा विचार केल्यास आकड्यात तफावत असल्याचं दिसतंय. फडणवीसांनी शेअर केलेल्या ट्विट मध्ये १ लाख ५० हजार डोस कमीच आहेत असं म्हणता येईल.

पण स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवसात नवीन पुरवठा न झाल्यास प्रतिदिन ४ लाख पेक्षा अधिक डोस प्रमाणे शिल्लक असलेले १५ लाख डॉस अर्थात संपणार आहेत. विशेष म्हणजे फडणवीसांनी केलेलं ट्विट दोन दिवसांपूर्वीच आहे आणि त्यामुळे प्रतिदिन ४ लाखाहून अधिक डोस दिले जातं आहेत. उपलब्ध असलेले डोस हे संपूर्ण राज्यसभरात वेगवेगळ्या आकडेवारीत वितरित करण्यात आले आहेत. मात्र अनेक शहर आणि नगरपालिकांच्या हद्दीत तो संपला आहे. परिणामी अनेक ठिकाणी लसीकरण थांबलं आहे. मात्र जेथे शिल्लक आहे तेथे ते अजून सुरु राहील. दररोज ४ लाखाहून अधिक लसीकरण केल जाते, ६ एप्रिलला १५ लाख डोस शिल्लक होते, तर ते उद्या ९ एप्रिलला सर्व डोस संपतील. मात्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रात आजच लसीकरण ठप्प झाल्याचा कांगावा करत असल्याची टीका सुरु झाली आहे.

 

News English Summary: The issue of corona vaccine is currently hot in Maharashtra. Health Minister Rajesh Tope has informed that there is a shortage of corona vaccine in the state and there is enough stock of vaccine for the next 2 to 3 days. Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis has now responded to the Thackeray government.

News English Title: Shortage of Corona vaccine in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x