पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. भाजपच्या २०१४ मधील निवडणुकीच्या यशात समाज माध्यमांचा मोठा वाटा होता. त्यामुळे समाज माध्यमांचे महत्व लक्षात घेता तो अधिक ताकदीने राबविण्यासाठी भाजपने त्यांच्या टीमला सूचना दिल्याचे समजते.

अमित शहा यांनी पुण्यात भाजपच्या सोशल मिडिया स्वयंसेवकांशी संवाद साधला तेव्हा अनेक महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आणि समाज माध्यमांचे महत्व सोशल मिडिया स्वयंसेवकांना पटवून दिले. भाजपला मोठ्या प्रमाणावर पुन्हा मतदान हवं असेल तर समाज माध्यम अधिक कार्यक्षम पणे वापरावे लागेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं होत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मधील निवडणुकीत संपूर्ण देशात २ कोटी नवीन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि भाजपने त्या नवीन मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी नवी योजना आखल्याचे ते म्हणाले.

अमित शहा यांनी समाज माध्यमांवर आधारित आखलेला नियोजित प्लॅन २०१९
१. भाजपने समाज माध्यम हाताळणाऱ्या त्यांच्या टीमला त्रिसूत्री कार्यक्रम आखून दिला आहे.
२. त्यानुसार भाजपने समाज माध्यमांसंबंधित ३ वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत.
३. त्यामधील पहिली टीम भाजप सरकार व भाजप पक्षा विरोधात प्रिंट मीडियात येणाऱ्या बातम्यांवर लक्ष केंद्रित करेल.
४. त्यामधील दुसरी टीम निवडणूकीदरम्यानच्या काळात येणाऱ्या आणि वेगाने पसणाऱ्या बातम्यांवर लक्ष केंद्रित करेल.
५. त्यामधील तिसरी टीम या सर्व माहितीच्या आधारे त्यांच्या क्रिएटिव्हिटी, कार्टून तसेच विविध ऍनिमेशन तयार करून विरोधकांच्या बातम्यांना सडेतोड उत्तरं देईल.
६. तसेच मतदानाशी संबंधित प्रत्येक बुथमध्ये राजकारणाशी संबंधित नसलेल्या ५ व्यक्ती नेमण्यात येतील.
७. मोदी सरकार विरोधी बातम्यांचे खंडन करणाऱ्या बातम्या आणि त्यांचे सविस्तर बुलेटिन दर दिवशी सकाळी सर्वसामान्य लोकांना पाठवणार.
८. इतकंच नाही तर हेच सकाळी प्रसारित होणारे पक्षाचे बुलेटिन कार्यकर्ते इतर मित्रांना आणि समाज माध्यमांवरील विविध ग्रुपमध्ये शेअर करतील.

अशा प्रकारे २०१४ मधील तेच तंत्र पुन्हा २०१९ मध्ये अधिक ताकदीने अंमलात आणण्याची योजना भाजपकडून तयार करण्यात आली आहे.

Amit Shah have concentrated over importance of social media in 2019 lok sabha election