7 May 2025 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

हिंदू-मुस्लिम नव्हे माणुसकी | 22 लाखांची SUV विकून मुंबईकरांसाठी 'ऑक्सिजन मॅन' झालाय शहनवाज शेख

Oxygen Man Shahnwaj Sheikh

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.

मात्र, आता ३ लाख नव्या रुग्णांत महाराष्ट्रातील फक्त २०% रुग्ण आहेत. उर्वरित ८०% इतर राज्यांतील आहेत. विशेष म्हणजे देशातील निम्मे रुग्ण फक्त महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत आढळत आहेत. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग केरळमध्ये आहे. येथे निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर रुग्णसंख्या ३ हजारांवरून २२ हजारांवर गेली आहे.

दरम्यान, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकीकडे रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावत आहेत, तर दुसरीकडे मुंबईच्या मलाडमध्ये राहणारे शहनवाज शेख लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत. ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेले शेख एका फोन कॉलवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहेत. लोकांना अडचण येऊ नये यासाठी त्यांनी एक ‘वॉर रुम’ ही तयार केली आहे.

शाहनवाज यांनी लोकांच्या मदतीसाठी काही दिवसांपूर्वी आपली 22 लाखांची SUV विकली होती. आपल्या फोर्ड एंडेवरच्या विक्रीनंतर मिळालेल्या पैशांनी शाहनवाजने 160 ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करुन गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत. शाहनवाज यांनी सांगितले की, गेल्या वर्षी लोकांच्या मदतीदरम्यान आमच्याजवळचे पैसे संपले. यानंतर मी माझी कार विकण्याचा निर्णय घेतला.

शाहनवाज म्हणाले की, गेल्या वर्षी संक्रमण कालावधीच्या सुरूवातीलाच त्यांच्या एका मित्राच्या पत्नीने ऑक्सिजन अभावी ऑटो रिक्षात मृत्यू प्राण सोडले. त्यानंतर त्यांनी आता मुंबईतील रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. लोकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आणि वॉर रुमही बनवली.

शाहनवाज सांगतात की, या वेळी परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती. जानेवारीत जिथे ऑक्सिजनसाठी 50 कॉल होते, आज दररोज 500 ते 600 कॉल येत आहेत. परिस्थिती अशी आहे की, आम्ही केवळ 10 ते 20 टक्के लोकांपर्यंत मदत पोहोचवू शकत आहोत. टीमचे लोक रुग्णांना याचा वापर कसा करावा याविषयी सांगतात. वापर झाल्यानंतर जास्तीत जास्त रुग्णांचे नातेवाईक वॉर रुमपर्यंत रिकामे सिलेंडर पोहोचवतात. शाहनवाज यांच्यानुसार, त्यांनी गेल्यावर्षीपासून आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवली आहे.

 

News English Summary: Across Maharashtra, including Mumbai, patients are dying due to lack of oxygen, while Shahnawaz Sheikh, who lives in Malad, Mumbai, has become an example for the people. Sheikh, popularly known as ‘Oxygen Man’, is working to deliver oxygen to patients on a phone call. He has created a ‘war room’ so that people do not get in trouble.

News English Title: Oxygen man of Mumbai Shahnwaj Sheikh help more than 4 thousand patient by suppling oxygen cylinder news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या