29 April 2024 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

BREAKING | हरयाणा'मध्ये ऑक्सिजन टँकर चोरीला, पोलीस ठाण्यात तक्रार | गचाळ व्यवस्थापन

Covid Oxygen tanker

नवी दिल्ली, २३ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची हाय लेव्हल मीटिंग सुरू झाली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हात जोडले आहे. केजरीवाल म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा तर वाढवला आहे, आता हा पुरवठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. राज्यात आमचे ट्रक रोखले जातात, त्यांना तुम्ही एक फोन करा. केजरीवाल म्हणाले – मुख्यमंत्री असुनही काहीच करु शकत नाहीये. काही वाईट घडले तर आम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.

दुसऱ्याबाजूला सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उद्भवलेल्या ऑक्स‍िजन संकटामध्ये महाराष्ट्रासह २० राज्यांना पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्व संबंधित मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी यांची बैठक पार पडली आहे.

मात्र आता ऑक्सिजन पुरवठयावरून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हरयाणातील पानिपत येथून सिरसाकडे निघालेला ऑक्सिजन टँकर हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

 

News English Summary: Now a shocking news has come out from the oxygen supply. According to PTI, a complaint has been lodged with the police that an oxygen tanker heading from Panipat in Haryana to Sirsa has gone missing. Therefore, the government’s mismanagement has come to the fore again.

News English Title: In Haryana Oxygen tanker headed from Panipat to Sirsa goes missing police file FIR says official to PTI news updates.

 

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x