1 May 2024 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मोदींच्या वाराणसीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा | गरजेच्यावेळी आमचे खासदार नरेंद्र मोदी कुठे आहेत? जनतेचा सवाल

India corona pandemic

वाराणसी, ०६ मे : कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.

ही दुसरी वेळ आहे, जेव्हा देशात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. यापूर्वी, 30 एप्रिलला 4 लाख 2 हजार 14 रुग्णांची नोंद झाली होती आणि 3525 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ठीक झालेल्या रुग्णांचा आकडाही कालपेक्षा कमी आहे. मंगळवारी देशात 3.37 लाख रुग्ण ठीक झाले होते, तर आज 3.24 लाख रुग्ण ठीक झाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदासंघ असलेल्या वाराणसी आणि आसपासच्या भागातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. वाराणासीत पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही, अॅम्बुलन्ससुद्धा मिळत नाही. इतकंच नाही तर कोरोना चाचणी करण्यासाठीही आठवडाभर वाट बघावी लागत आहे. गेल्या दहा दिवसात औषधांच्या दुकानांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि पॅरासिटमॉलसारख्या साध्या औषधांचाही तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक चिंतित आहेत.

वाराणासीत आतापर्यंत ७०,६१२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना संसर्गामुळे ६९० जणांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिलनंतर ६०% म्हणजे ४६,२८० रुग्णांची नोंद झाली, यावरूनच परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज बांधता येईल. मात्र अशा संकटाच्या आणि गरजेच्यावेळी आमचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत, असा सवाल आता वाराणसीची जनता विचारू लागली आहे.

 

News English Summary: The situation has worsened in and around Varanasi, the constituency of Prime Minister Narendra Modi, due to the second wave of corona. There are not enough health facilities in Varanasi. Hospitals have no beds, no oxygen, no ambulances.

News English Title: The situation has worsened in Varanasi due to corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x