4 May 2025 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे

Central Vista Project

नवी दिल्ली, ०९ मे | गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील Central Vista चं बांधकाम चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पाच्या किंमतीपासून त्याच्या बांधकामासाठी करोना काळात देखील विशेष परवानगी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. विरोधकांकडून या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर बोट ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथल्या बांधकामानंतर जगप्रसिद्ध अशा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर हा आता इतिहास झाला आहे. अनेकांनी याबाबद्दल खेद व्यक्त करत देश मोदींना कधीही माफ करणार नाही असं म्हटलं आहे.

ल्युटेन्स दिल्ली परिसरामध्ये असलेल्या सेंट्रल व्हिस्टा भागात हा पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये संसदेची नवी इमारत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, मध्यवर्ती सचिवालय आणि इतर अनेक सरकारी इमारतींचं बांधकाम या भागात केलं जात आहे. यासाठी १२०० ते १३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून बांधकाम सुरू आहे. करोना काळातही अपवाद म्हणून या प्रकल्पाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरले आहे. देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.

 

News English Summary: The construction of Central Vista in the capital Delhi has been the talk of the town for the past few days. Objections are being raised on a number of issues, from the cost of the project to the granting of special permits even during the Corona period for its construction. Opposition groups called for a boycott of the project. What is special is that after the construction here, the world famous India Gate and its surroundings have now become history.

News English Title: Delhi Central Vista Project impact over India Gate news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या