29 April 2024 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राजस्थान | मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार

Chief Minister Chiranjeevi Health Insurance Scheme

जयपूर, ०९ मे | देशासह राजस्थान राज्यातही कोरोना महामारीचा प्रार्दुभाव वाढत आहे. परंतु, राजस्थानमध्ये पहिल्यांदा नवीन प्रकरणांपेक्षा रिकव्हर होणार्‍यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांत ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. तरीदेखील राजस्थान सरकारने 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे. राज्यात उद्या सोमवार सकाळी 5 वाजेपासून 24 मे पर्यंत कडक निर्बंध असून यात सार्वजनिक-खाजगी वाहतूकही बंद असणार आहे. तसेच या लॉकडाऊनदरम्यान कोणीही अनवाश्यकपणे बाहेर पडल्यास त्याला पोलिसांकडून क्वारंटाइन केले जाणार आहे.

राजस्थानमध्ये आतापर्यंत 7.38 लाख लोक कोरोना महामारीच्या विळाख्यात आले असून यामधील 5.33 लाख लोक रिकव्हर झाले आहे. राज्यात सक्रीय रुग्णांचा आकडा 1.99 लाख आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात 17 हजार 987 नवीन प्रकरणे समोर आले असून यामधील 17 हजार 667 लोक बरे झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील 15 जिल्ह्यांत नवीन रुग्णांपेक्षा रिकव्हर होणार्‍या लोकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेतलाय. गेहलोत सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जोडल्या गेलेल्या सर्व परिवारांना मिळणार आहे.

राजस्थान राज्य आरोग्य विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णांना सर्व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे. या योजनेशी जोडले गेलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाने नकार दिला तर त्या रुग्णालयाविरोधात कठोर पाऊल उचलावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

 

News English Summary: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot has taken a big decision. The Gehlot government has decided to provide free treatment to Corona patients in all private hospitals in the state under the Chief Minister Chiranjeevi Health Insurance Scheme. The scheme will benefit all the families connected through the Collector.

News English Title: Corona patients will get free treatment in private hospitals in Rajasthan news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x