2 May 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

नको तिथे विवादित वक्तव्य | कंगना स्वतःच ठरतेय स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्यामागील कारण

Kangana Ranaut

मुंबई, ११ मे | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना रानौत ट्विटरवर नको ते बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगनाची सटकलीये, पण बॉलिवूडच्या एका गटात मात्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आनंद साजरा केला आहे.

मागील २ वर्षांत कंगना रनोट हिने जेवढी प्रसिद्धी एकवटली आहे, ती तिच्या कामापेक्षा अधिक वादाशी संबंधित आहे. एनआरसी-सीसीएनंतर शेतकरी आंदोलन आणि त्यानंतर बंगाल निवडणुका, कंगनान बिनधास्तपणे आपले मत व्यक्त केले. मात्र, यामुळे यामुळे कॉन्ट्रोव्हर्सी क्वीला बराच मनःस्तापदेखील सहन करावा लागला आहे. एकेकाळी कंगनाकडे अनेक ब्रॅण्ड्सचे एंडोर्समेंट्स होते, मात्र आता तिच्या हातात काहीच उरले नाही. एक प्रकारे ब्रॅण्ड कंगनाच्या लोकप्रियतेला ग्लॅमरच्या दुनियेत उतरती कळा लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.

4 राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म पुरस्कार आपल्या नावी करणा-या कंगनाने आपल्या कामामुळे प्रत्येकाला आश्चर्यचकित केले आहे, परंतु मार्केट तज्ज्ञांच्या मते, तिचे ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याचे कारणही ती स्वतःच आहे. प्रत्येक मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करणे आणि इंडस्ट्रीतील लोकांशी थेट थेट पंगा घेणे, ही त्यामागचे कारणे आहेत. यामुळे, बहुतेक ब्रँड्सनी तिच्यासोबतचे करार मोडले आहेत.

स्वत: कंगनाने मुलाखतीत सांगितले होते की. शेतकरी आंदोलनाच्या विरोधात मत व्यक्त केल्यानंतर तिला 15 कोटी रुपयांचे ब्रँड एंडोर्समेंट्स गमवावे लागले होते. तेव्हापासून सुरु झालेला हा क्रम आजतागायत सुरु असून आता तिच्या हातात केवळ लिवा फॅब्रिक आणि मुंबईतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुप प्लॅटिनम या ब्रँड्सशिवाय इतर कोणताही मोठा ब्रँड नाहीये. लिवा फॅब्रिक हा बिर्ला ग्रुपच्या ग्रासिम इंडस्ट्रीचा ब्रँड आहे.

आंतरराष्ट्रीय कंपनी डफ अँड फैल्प्सने तीन महिन्यांपूर्वी ब्रँड व्हॅल्यूनुसार भारताच्या टॉप 20 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. यामध्ये दीपिका पाच कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पाचव्या क्रमांकावर होती. आलिया सहाव्या, अनुष्का 13 व्या आणि 1.59 कोटी डॉलरच्या ब्रँड व्हॅल्यूसह प्रियांका 19 व्या स्थानावर होती. या यादीमध्ये कंगनाचा समावेश नव्हता. धर्मा प्रॉडक्शनच्या ‘दोस्ताना -2’ मधून बाहेर पडल्यानंतर कार्तिक आर्यनला अलीकडेच कंगनाने पाठिंबा दर्शविला होता. कार्तिक 1.5 कोटी डॉलरच्या ब्रँड व्हॅल्यूसह या यादीत 20 व्या स्थानावर आहे.

 

News English Summary: Kangana Ranaut, who has bagged 4 National Awards and Padma Awards, has surprised everyone with her work, but according to market experts, it is also the reason for her declining brand value. The reasons behind this are to express a strong opinion on every issue and to deal directly with the people in the industry. As a result, most brands have broken their agreement with her.

News English Title: Bollywood actress Kangana Ranaut brand value decreasing highly in Market news updates.

हॅशटॅग्स

#Entertainment(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x