27 April 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न

Vaccination

मुंबई, १२ मे | देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत 17.51 कोटी लोकांचे लसीकरण:
आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, मंगळवारी 23.8 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, आतापर्यंत देशातील 17.51 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यात 95 लाख 81 हजार 872 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65 लाख 38 हजार 656 जणांना दुसरा डोस झाला आहे.

याशिवाय, फ्रंट लाइन वर्कर्सपैकी 1 कोटी 41 लाख 45 हजार 83 जणांना पहिलाडोस आणि 79 लाख 50 हजार 430 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. 45 वर्षांपेक्षा वरील 5 कोटी 58 लाख 70 हजार 91 जणांचा पहिला डोस तर 78 लाख 17 हजार 926 जणांचा दुसरा डोस झाला आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5 कोटी 39 लाख 54 हजार 858 लोकांचा पहिला, तर 1 कोटी 62 लाख 73 हजार 279 लोकांचा दुसरा डोसदेखील झाला आहे.

तत्पूर्वी मुंबई महानगपालिकेने घरोघरी जाऊन वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणासंबंधित परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र, ती केंद्राने फेटाळली होती. विशेष म्हणजे अशी मागणी इतर राज्यांमधून देखील पुढे येऊ लागली होती. याच विषयावरून मुंबई हायकोर्टात एका याचिकेवर सुनावली पार पडली. त्यावेळी विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? असा थेट प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.

 

News English Summary: Why not start door to door vaccination proactively when lives of senior citizens are concerned asked Bombay High court to Centre govt news updates

News English Title: Why not start door to door vaccination proactively when lives of senior citizens are concerned asked Bombay High court to Centre govt news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x