2 May 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट'

Amruta Fadnavis

मुंबई, १७ मे | कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.

यापूर्वी देखील त्यांच्या अनेक ‘निरर्थक ट्वीट्स’ला प्रसार माध्यमांनी ‘सूचक ट्विट’ असं संबोधल्याने त्यांच्या वायफळ ट्विटपणाला अनेकदा खतपाणी मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. आता त्यांनी पुन्हा कोरोना आपत्ती आणि वादळाच्या विचारात शहरं आणि राज्य व्यस्त असताना एक निरर्थक ट्विट पुन्हा केल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. ट्विट केलं ठीक वगरे ठीक आहे पण त्यात ‘देखें अबके किसका नंबर आता है !’ अशी निरर्थक ओळ देखील ट्विट केली आहे.

काय आहे अमृता फडणवीस यांचे ट्विट?
‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायेच आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच या राजकीय वादळाचा फटका कोणाला बसणार, महाराष्ट्रातील राजकारणावर, सरकारवर त्याचे काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न अमृता फडणवीस यांच्या या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.

 

News English Summary: Amrita Fadnavis’s attempt to stay in the limelight by tweeting on any subject is nothing new. They also dream of a change of government in any subject. Often the question arises as to whether they understand the meaning of their tweets themselves.

News English Title: Amruta Fadnavis meaning leas tweet during tauktae cyclone news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या