20 May 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

कोरोना आपत्तीत जगभरातून टीका झालेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना आत्तापासूनच निवडणुकांचे वेध

Uttar Pradesh Corona pandemic

लखनऊ, ०३ जून |  संपूर्ण देशात कोरोना काळात सर्वात भयावह स्थिती पाहायला मिळाली ती उत्तर प्रदेश राज्यात. जगभरात ते चित्र उमटले. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. “आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू”, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.  2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु, कोरोना काळात जे प्रचंड अपयश योगी सरकारला आले आहे ते पाहता ही निवडणूक योगी सरकार आणि भारतीय जनता पक्षासाठी मोठी कठीण ठरू शकते. मात्र, या परिस्थितीतही विधानसभा निवडणुकांसाठी योगी आदित्यनाथ यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.

जागरण वृत्त समुहाच्या संपादकीय मंडळाशी बोलताना येत्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातही योगी आदित्यनाथ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तर प्रदेश सरकारने यशस्वी कामगिरी केल्याचे म्हणत स्वतः पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. आता मोदींच्या याच कौतुकामुळे योगी आदित्यनाथ यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. उत्तर प्रदेशमधील कोरोनास्थिती आटोक्यात आणल्याने योगी आदित्यनाथ समाधानी असल्याचे म्हटले जात आहे.

जगभरात ज्याचे पडसाद उमटले आणि देश हादरला त्या गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांबद्दलच्या घटनेवरही योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण आता आले आहे. “सध्या अनेकजण अफवा पसरविण्यात आणि वातावरण दुषित करण्याचं काम करत आहेत”, असे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे.

 

News English Summary: The worst situation in the country during the Corona period was in the state of Uttar Pradesh. The picture spread all over the world. But now the Uttar Pradesh chief minister is looking forward to the elections. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has claimed, “We lost to Corona, now we will win the Assembly elections too.”

News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 chief minister Yogi Adityanath is looking forward to the elections news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x