29 April 2024 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आरपीआय आठवले गटात फूट, वेगळा युनायटेड रिपब्लिकन पक्ष स्थापन करणार

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात उभी फूट पडली आहे. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी युनायटेड रिपब्लिन पक्ष या नावाने नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अधिकृत घोषणा ४ ऑगस्ट रोजी नाशिक येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा रामदास आठवले आणि भाजप या दोन्ही पक्षांना निवडणुकीपूर्वी धक्का मानला जात आहे.

आरपीआय’चे प्रवक्ते व प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी आरपीआय आठवले गटाचा राजीनामा देऊन थेट रामदास आठवलेंशी निवडणुकीआधी फारकत घेतली आहे. पुढे पत्रकारांशी संवाद साधताना अशोक गायकवाड म्हणाले की, लवकरच नव्या पक्षाची घोषणा करून आमची ध्येय धोरण जाहीर करून भाजपला कडवा विरोध करणार असल्याचं स्पष्ट केलं. हातात पुरेसा संख्याबळ असताना सुद्धा भाजपने मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊ असं सांगणाऱ्या भाजपने संबंधित समाजाच्या हातावर तुरी दिल्या आहेत. तसेच आम्हाला दिली आश्वासनं सुद्धा भाजपने पाळली नसल्याने आम्ही फारकत घेऊन वेगळा निर्णय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असं गायकवाड म्हणाले.

आरपीआय आठवले गटात केवळ रामदास आठवले वगळता इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांना पद दिले गेले नाही. त्यामुळे त्यांनी आंबेडकरी जनतेबरोबर केवळ भावनिक राजकारण केले आहे. त्यामुळेच पक्षात नाराज असलेल्या सुमारे दीडशे प्रमुख नेते, पदाधिकारी असलेला गट घेवून आम्ही युनायटेड रिपब्लिन पक्ष स्थापण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे असं गायकवाड पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x