मुंबई , १३ जून | मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसचं शनिवारी (12 जून) पेट्रोल दरवाढीविरोधात गोरेगावमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचान देण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत भाई जगताप यांची बाचाबाची झाली. यावेळी भाई जगताप यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देखील दिला. हा संबंध प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
भाई जगताप यांचा पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ आता समोर आाल आहे. या व्हिडीओत काँग्रेसचं आंदोलन सुरु असल्याचं दिसत आहे. या आंदोलनात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे देखील सहभागी झाले आहेत. जगताप यांच्या हातात माईक असतो. या आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. ते आंदोलकांना सूचना देतात. यावेळी भाई जगताप पोलिसांकडे येतात. ते पोलिसांना आरे-तुरेची भाषा वारताना दिसतात. हा (पोलीस) जर आंदोलन बंद करा, असं सांगत असेल तर हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरु ठेवा, असं जगताप यावेळी म्हणतात. त्यानंतर इतर आंदोलक जोरजोरात घोषणाबाजी करतात.
VIDEO | पोलिसाशी हुज्जत आणि पोलीस कॉन्स्टेबलला धक्का | भाई जगताप यांची व्हिडीओ व्हायरल. pic.twitter.com/AcXdYQpTXC
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 13, 2021
News Title: Mumbai Congress president MLA Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregaon news updates.
