29 April 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

३० वर्ष भाजपसोबत असूनही काही घडलं नाही, मग आता काय घडेल? - मुख्यमंत्री

Mahavikas Aghadi

मुंबई, ०६ जुलै | विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. दरम्यान पहिल्याच दिवशी अधिवेशनाच प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधी मंडळात अभुतपूर्वी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तर याचा परीणाम म्हणून दुसऱ्या दिवशी निषेध व्यक्त करत भाजपने सभागृहा बाहेर प्रतिविधानसभा भरवली. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.

बाळासाहेब थोरात, अजितदादांना हसू अनावर:
महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. या वेळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “तीस वर्ष सोबत असूनही भाजपसोबत काही घडलं नाही, मग आता काय घडेल?” मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने शेजारी बसलेल्या बाळासाहेब थोरात आणि अजित दादांना देखील हसू अनावर झालं. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.

काल जे घडले तेर लाजिरवाणे:
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘काल जे काही घडले आहे, हे कितीही कुणी काही म्हटले तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणी घटना होती. आपली ही संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. सध्या जे काही सुरू आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडत आहे? पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे’

आरडाओरडा करणे ही लोकशाही नाही:
भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावरुन मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या 12 आमदारांची नियुक्ती केली नाही. म्हणून त्यांच्या 12 आमदारांना निलंबित केले असे बोलले जात आहे. मात्र असे नाही आम्ही हे ठरवून केलेले नाही. तसेच आम्ही त्यांना टोचले नव्हते त्यांनीच ते केले. आरडाओरड करणे ही लोकशाही नाही. आरडाओरड करणे हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray reply on news over alliance with BJP again news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x