29 April 2024 6:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

मुंबई, ०७ जुलै | अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय धक्का बसला होता. कारण राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं होतं. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला होता. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हायकोर्टात गेले होते. आनंदराव अडसूळांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला होता.

२०१३ मध्ये नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला. आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निकाल सुनावण्यात आला होता.

दरम्यान, काल ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली त्याचबरोबर शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. या गोधळात अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता भास्कर जाधव यांनी त्यांना अक्षरशः हाकलून देत बाहेर काढण्याचे आदेश दिले. याच दोन्ही विषयांना अनुसरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटवर कोणचही नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. त्यांनी मोजक्या शब्दात ट्विट करताना म्हटलंय की, “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rupali Chakankar indirectly slams MLA Ravi Rana and Navneet Rana news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x