18 May 2024 8:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Special Recipe | सुक्की भाजी हवी असल्यास घरी भरल्या भेंडीचा बेत करा

Delicious okra fry recipe in Marathi

मुंबई ७ जुलै : भेंडीची पातळ भाजी, भेंडी फ्राय बरोबरच भरली भेंडी खूप अप्रतिम लागते . त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहेत.

साहित्य :
* 250 ग्राम भेंडी
* 1 छोटा कांदा बारीक चिरून
* 1 टेबलस्पून ब्याडगी मिरची पावडर
* 1/2 टीस्पून हळद
* 1/2 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून कांदा लसूण मसाला
* 2-3 टेबलस्पून शेंगदाणा कूट
* चवीनुसार मीठ आणि साखर
* बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :
१) आधी भेंडी स्वच्छ धुवून पुसून आणि सुकवून घ्या, नंतर त्याचे देठ आणि टोक काढून 2 इंच तुकडे करून भेंडी मधोमध दोन भाग करून घ्या आणि चमचाभर तेलात भेंडी फ्राय करून बाजूला काढून घ्या
२) आता एका कढई मध्ये तेल,गरम करा,त्यात कांदा परतून नंतर सर्व मसाले आणि शेंगदाणा कूट घालून मिक्स करून घ्या
३ ) त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्या आणि मिक्स करा, आता त्यात फ्राय केलेली भेंडी घालून घ्या आणि मिक्स करा
४) भेंडी मसाल्यामध्ये शिजू द्यावी नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि सर्व्ह करावी, झटपट भरली भेंडी
(या भेंडीमध्ये वेगळा मसाला भरायची गरज लागत नाही, तेलात फ्राय केल्यामुळे भेंडी नरम होतात आणि तयार मसाला त्याला व्यवस्थित लागतो)

News Title: Tasty and yummy okra fry Bhaji recipe in Marathi news update.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x