6 May 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
x

पेट्रोल महागले तर काय झाले, सुविधा मिळाल्या | लस मोफत मिळत आहे - सुजय विखे पाटील

BJP MP Sujay Vikhe Patil

मुंबई, १२ जुलै | देशात एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन सामान्य जनेतला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तर दुसरीकडे या दरवाढीचा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. पेट्रोल डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी यांनी लस मोफत दिली त्याचादेखील फलक झळकवा. असा अजब युक्तीवाद भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

विखे फाउंडेशनच्या कार्यक्रमात केला युक्तीवाद:
खासदार सुजय विखे पाटील हे विळद घाट येथील डॉ. विखे पाटील फाउंडेशन रुग्णालायचे अर्बन सेंटरच्या उद्घाटनप्रंसगी आले होते. यावेळी आमदार संग्राम पाटीलसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, खासदार सुजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा युक्तीवाद केला.

दरवाढीचे फलक लावताना मोदींचेही फलक लावा:
काँग्रेसने राज्यात इंधन दरवाढीवरुन आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील यांनी दरवाढीच्या बदल्यात मोफत सुविधा पाहाव्यात. केंद्र सरकार 35 हजार कोटी रुपये खर्च करुन मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे. हे काम राज्य सरकारचे असून त्यांनी ते केले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीच्या विरोधात फलक लावताना पंतप्रधानांनी मोफत लस दिली म्हणून त्याचेही फलक लावा असे सुजय विखे पाटील म्हणाले.

अपयश लपवण्यासाठी हे नाटक:
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलबेल नसल्याचे दिसत आहे. परंतु, हे सर्व नाटक असून आपले अपयश झाकण्यासाठी ते करत आहे. यामुळे जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अस्तित्वाची लढाई म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे त्यामुळे ते सहजासहजी वेगळे होणार नसल्याचे ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MP Sujay Vikhe Patil support fuel price hike news updates.

हॅशटॅग्स

#SujayVikhePatil(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x