कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सांगलीत पुराचा धोका

सांगली, ६ ऑगस्ट : जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला जाऊ शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांनी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. ढगांची दाटी कायम असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर जोर कमी होणार आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदल्या गेलेल्या चोवीस तासातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी २५.४३ मिलिमीटर पाऊस झाला. मिरज तालुक्यात २९.९, तासगावमध्ये १८, कवठेमहांकाळमध्ये १४.४, वाळवा-इस्लामपूरमध्ये २९, शिराळ्यात ७९.७, कडेगावमध्ये ३0, पलूसला २0.८, खानापूर-विटा येथे १३.६, आटपाडीत १.७, जतमध्ये ४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
वारणा धरणात सध्या २६.३३ म्हणजेच ७६.५२ टक्के पाणीसाठा झाला असून कोयना धरणात ६0.२८ म्हणजेच ५७.२७ टक्के पाणीसाठा आहे. वारणा धरणातून ९५0 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
News English Summary: It is raining heavily in the district. The water levels of Krishna and Warna rivers have risen sharply. The water level of Krishna river near Sangli has risen to 20 feet. Therefore, the risk of floods in Sangli remains.
News English Title: Danger of flood in Sangli big increase in water level of Krishna and Warna rivers News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
गुजरातमध्ये भरधाव ट्रकखाली चिरडून फूटपाथवर झोपलेल्या १३ मजुरांचा मृत्यू
-
अॅमेझॉन अॅकॅडमी | E-learning Entry | JEE ते स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन तयारी
-
शेतकऱ्यांना घरी जाऊदे | मग कमिटीचा अहवाल ग्रीन सिग्नल देईल | मग सर्व मेहनत वाया
-
ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव | पंत-गिलची दमदार फलंदाजी
-
आता तरी शेतकऱ्यांचे हित पाहावे | पवारांचा मोदी सरकारला टोला
-
टेस्लाची R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती | नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक
-
कृषी कायदा | सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत | कोण आहेत या समितीत
-
टाइम्सनाऊ'वर अर्नबचा 'गिधाड' असा उल्लेख | अर्थात देशासाठी नव्हे तर वयक्तिक खुन्नस
-
कृषी कायद्याला विरोध | स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार
-
शेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसखोरीबद्दल सुप्रीम कोर्टात माहिती | RTI मध्ये म्हटलं होतं नाही