8 May 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु
x

Health First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा

Home remedies on dark circles

मुंबई, १३ जुलै | डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कलमुळे व्यक्तींचं सौदर्य बिघडतं. ही अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. डोळ्यांखाली काळे डाग येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यास, कमी झोप घेणे, मानसिक तणाव किंवा फार जास्तवेळ कम्प्युटरसमोर काम करणे या कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. याने सुंदरता कमी होते सोबतच व्यक्ती थकल्यासारखा आणि वयोवृद्ध दिसतो. पण यावर काही घरगुती उपायांनी मात केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ काही घरगुती उपाय..

बदाम तेल:
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी गुलाबपाण्यात बुडवलेल्या कापसाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवणे हा घरगुती उपाय सगळ्यांनाच माहित आहे. पण आता हा उपाय करून बघा. बदाम तेलात ऑरगॅनिक मध घालून मिश्रण तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या भोवती लावा.

ग्रीन टी:
ग्रीन टी बॅगमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि tannins असते. याचा उपयोग डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी होतो. त्याचबरोबर chamomile tea मध्ये देखील मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. तसंच स्किन ब्लिचिंग आणि स्किन क्लीनजींग गुणधर्म असतात.

कोल्ड मिल्क:
दुधात लॅक्टिक अॅसिड, प्रोटीन, एन्झाईम्स आणि इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवणे हा अतिशय उत्तम उपाय आहे.

बर्फ:
बर्फामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

सफरचंद:
सफरचंदात tannic अॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ होण्यास मदत होते. काळे डाग, स्पॉट्स दूर करण्यास देखील ते फायदेशीर ठरते. तसंच सफरचंदात व्हिटॅमिन बी, सी आणि पोटॅशियम अधिक प्रमाणात असल्याने त्वचेचे आतून पोषण होण्यास मदत होते.

पुदिना:
डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी पुदिना देखील चांगला उपाय आहे. त्यात अँटीबॅक्टरील, अँटिसेप्टिक आणि अँटीमिक्रोबियल गुणधर्म आहेत. तसंच पुदिन्यातून त्वचेला थंडावा मिळतो.

ऍव्होकॅडो फळ:
ऍव्होकॅडो हे फळ त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. त्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई, के आणि बी असते. त्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. याचा वापर नियमित केल्यास त्वचा टवटवीत आणि तेजस्वी दिसते.

जास्मिन ऑइल:
डार्क सर्कल्सवर नाईट जास्मिन आणि ऑलिव्ह ऑईल लावल्याने देखील फायदा होतो. नाईट जास्मिन ऑईलमध्ये अँटी इन्फ्लामेटरी कंपाऊंडस असतात. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलची मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Effective home remedies on dark circles in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x