15 December 2024 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Health First | वजन कमी करण्यासह फ्लॉवरचे इतर ५ फायदे

Benefits, Cauliflower vegetable, health article

मुंबई, ०७ मार्च: आता जास्तीत जास्त सामान्य लोक डाएटचा आधार घेताना दिसत आहेत. अशातच काहीजण अशा काही भाज्यांच्या शोधात आहेत, ज्या चवीसोबतच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. या सर्व भाज्यांमध्ये फ्लॉवरची भाजी सर्वात उत्तम पर्याय आहे. जास्तीत जास्त लोक आहारामध्ये या भाजीचा समावेश करत आहेत. जाणून घेऊया फ्लॉवरच्या भाजीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांबाबत जी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. (Benefits of cauliflower vegetable health article)

फ्लॉवर किंवा फूलगोभी भाजी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते. क्रूसिफेरस या प्रकारातील Cruciferous vegetables ही भाजी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून लढण्यासाठी प्रभावी ठरते. शरीराला स्वस्थ्य ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉक्टरांकडूनही याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. हिरव्या भाजांच्या यादीत सामिल होणाऱ्या फ्लॉवरमध्येही हे गुण आढळतात. (Cruciferous vegetables are effective in fighting serious diseases like cancer)

फ्लॉवरमध्ये अस्तित्वात असलेलं व्हिटॅमिन के हाडांसाठी आणि शरीरातील रक्त वाढिसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं आणि यामध्ये असलेली फायटोन्यूट्रिएंट्स कॅन्सरच्या पेशी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.

शरीरासाठी फायदेशीर:
फूलगोभी अर्थात फ्लॉवरमध्ये शरीरासाठी फायदेशीर असणारं कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील ७७ टक्के, व्हिटॅमिन Kचे २० टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ६ असतं.

वजन कमी करण्यासाठी:
फ्लॉवरमध्ये इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत कार्बोहायटड्रेट अधिक असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ही भाजी फायदेशीर आहे. १०० ग्रॅममध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरी आणि ३-५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात.

फायबरची भरपूर मात्रा:
फ्लॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रियेच्या सुरळित कामासाठी आवश्यक आहे. फायबरयुक्त भाज्यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्याची शक्यता असते.

कॅन्सरशी लढण्यास प्रभावी:
फ्लॉवरमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडेन्ट असतात, ज्यामुळे कर्करोगास कारणीभूत घटकांची प्रभावीता कमी होते. फ्लॉवरसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असलेलं ग्लूकोसायनोलेट्स डीएनएला नुकसानापासून वाचवतात आणि पेशींचं आरोग्य चागंलं राखण्यास मदत करतात.

हृदयरोग:
फ्लॉवरच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारतं. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी ६ रक्तातील होमोसिस्टीन नियमित करण्यास मदत करते.

 

News English Summary: Now more and more ordinary people seem to be relying on diet. Similarly, some people are looking for some vegetables that are full of nutrients along with taste. Of all these vegetables, the cauliflower vegetable is the best option. More and more people are including this cauliflower vegetable in their diet. Let us know about the nutrients in cauliflower vegetables which are extremely beneficial for health.

News English Title: Benefits of cauliflower vegetable health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x