5 May 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
x

Health First | कोलेस्ट्रॉलची औषधे घेणे राहून गेल्यास काय होईल? - नक्की वाचा

cholesterol medicines

मुंबई, १७ जुलै | रोज औषधे घेणे अगदी कंटाळवाणे काम आहे. काहींना आपल्या व्यस्त कामाच्या स्वरूपामुळे वेळ मिळत नाही तर काहीजण औषधे घेण्याचा आळस करतात. खरंतर उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांना डॉक्टर वेळेवर औषधे घेण्याचा, ती मध्येच बंद न करण्याचा सल्ला देतात. आजारावर उपचार करण्यासाठी औषधांत सातत्य आणि नियमितता असणे गरजेचे आहे. परंतु, काही वेळा गोळ्या घेणे राहून जाते.

हाय ब्लड कोलेस्ट्रॉल ही अशी समसया आहे की त्यासाठी न चुकता रोज औषधे घेणे गरजेचे आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात. यामुळे हायपरटेन्शन, स्ट्रोक्स, हार्ट अटॅक आणि angina यांसारखे आजार होतात.

कोलेस्ट्रॉलची औषधे कशाप्रकारे काम करतात?
लिव्हर मध्ये कोलेस्ट्रॉलची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरणारे एन्झाईम HMG-CoA reductase याची निर्मिती औषधांमुळे थांबते. त्या औषधांमुळे एन्झाईम तयार होणारा लिव्हरमधील भाग ब्लॉक होतो. तसेच त्याला उत्तेजीत करणाऱ्या मॉलिक्युल्सला आळा बसतो. औषधांमुळे शरीरातील लिपिडची पातळी कमी होऊन शरीरात कोलेस्ट्रॉल परत शोषलं जातं. औषधांच्या या परिणामांमुळे स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि anginas चा धोका कमी होतो.

कोलेस्ट्रॉलच्या औषधांचा डोस घेणे राहून गेल्यास त्याचा काय परिणाम होईल?
औषधं टाळणे किंवा चुकून घेणे राहून जाणे, हे आरोग्यासाठी योग्य ठरणार नाही. एखादं दुसरा डोस चुकणे यात काही गंभीर समस्या नाही. परंतु, त्यापेक्षा अधिक डोस राहिल्यास त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. कारण त्यामुळे रक्तातील लिपिडची पातळी नियंत्रणात राहणार नाही परिणामी रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढेल . ही समस्या स्ट्रोक्स, हार्ट अटॅकसाठी शरीर गंभीर ठरू शकते, असे तज्ज्ञ म्हणाले. औषधे घेणे राहून गेल्यास तुम्ही काय कराल? लक्षात येताच राहून गेलेला डोस लगेच घेऊन टाका. पण एक डोस राहून गेला म्हणून त्याऐवजी डबल डोस घेऊ नका.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What will effect if you miss cholesterol medicines in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x