5 May 2024 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सामान्यांपासून ते सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. मागील ९ आठवड्यांपासून त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. परंतु ४ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु ते वाढतं वय तसेच दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केली, परंतु अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

आज सकाळ पासूनच भाजपच्या कार्यालयात अनेक नेत्यांची त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. अटल बिहारी वाजपेयी यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळेच त्यांच्या जाण्याने सर्वच पक्षातील नेते दुःख व्यक्त करत होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना आज नवी दिल्ली येथील राजघाटावर शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता.

काल संध्याकाळी त्यांचं उपचारादरम्यान नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून डिमेंशियाने आजारी होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी ३ वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. असा विक्रम करणारे ते पहिले बिगर काँग्रेसशी पंतप्रधान होते.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x