6 May 2024 3:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

Raigad landslide | ४४ मृतदेह काढले बाहेर | अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखालीच? | बचावकार्य सुरूच

Raigad landslide

रायगड, २४ जुलै | आधी महाराष्ट्रावर आभाळ कोसळले अन् आता दरडी. आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी व साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले तसेच इतर दुर्घटना घडल्या. गेल्या ४८ तासांत सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दुर्गम भाग व पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळिये गावात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दरड कोसळून ३० ते ३५ घरे गडप झाली. यात ३८ जणांचा मृत्यू झाला. आणखी ८० ते ८५ जण ढिगाऱ्यांत अडकल्याची शक्यता बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शुक्रवारी बचावकार्य सुरू झाल्यानंतर घटनेची भीषणता समोर आली. गावात एक मोठा धबधबा असून त्याशेजारची जागा भरावासाठी खोदण्यात आली होती. त्यामुळे दरड कोसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, चिपळूण तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडीत दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पाेलादपूर तालुक्यातील केवनाळे व सुतारवाडी येथे दरडीखाली ११ जणांचा मृत्यू झाला. खेडच्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळून काही कुटुंबे अडकली. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाईच्या कोंडवळी व मोजेझोर येथेही दरडी कोसळून एकूण २७ जण ठार झाले.

महाडमधील तळई येथे दरड कोसळल्याच्या घटनेत 85 व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी 23 जुलैच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 44 मृतदेह आढळले आहेत. तर अद्यापही 41 व्यक्ती बेपत्ता आहेत. रायगड जिल्हा प्रशासनामार्फत ही माहिती देण्यात आली. तळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. राष्ट्रीय आपत्ती बचाव पथक, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोध कार्य अद्यापही सुरू आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Raigad landslide LIVE updates after heavy rain in Konkan news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x