3 May 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

चिपळूणमधील त्या महिलेच्या प्रतिक्रियेनंतर सर्व विरोधक तोंडघशी | काय म्हणाल्या आमदार भास्कर जाधवांबद्दल?

MLA Bhaskar Jadhav

चिपळूण, २६ जुलै | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडताना स्थानिक शिवसेना आमदार भास्कर जाधव व्यापाऱ्यांना मोकळेपणाने बोलू देत नव्हते. बास करा, थांबा.. आपले सीएम आहेत, असे म्हणत आमदार जाधव अडथळे आणत होते. मुख्यमंत्र्यांना नुकसान भरपाईची विनवणी करणाऱ्या एका महिलेला शिवसेना नेते भास्कर जाधव दमदाटी केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर विरोधकांनी भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली. यानंतर आता चिपळूणमधील दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, असे ती महिला प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाली.

मागील अनेक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. मी खूप भावूक झाले होते. आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही, टीव्ही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोललं जातं हे अद्याप माहिती नाही. त्यांचा आवाजच तसा आहे. त्यांनी अरेरावी केली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते हातवारे करत बोलत होते. त्यामुळे लोकांना गैरसमज झाला,” अशी प्रतिक्रिया चिपळूणमधील त्या महिलेने दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Flood victim woman in Chiplun first comment over ShivSena MLA Bhaskar Jadhav threatening news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x