मुंबई ५ ऑगस्ट : कटलेट म्हटलं तर सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे त्यातल्या त्यात माश्यांचा कटलेट असलं तर तर मज्जाच मजा म्हणून मी तुम्हाला सुरमई माश्याच कटलेट्ची पाककृती सांगणार आहे.

साहित्य :
* 4-5 तुकडे सुरमई माशाचे
* 3 ते 4 उकडलेले बटाटे
* 1 कप पातीचा कांदा
* 1 कप ब्रेड क्रंप
* 1 टीस्पून मिरची आलं लसूण पेस्ट
* 1 टीस्पून लाल तिखट
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून चिली फ्लेक्स
* चवीनुसार मीठ
* कोटिंग साठी
* 1 अडं
* 1 कप ब्रेड क्रम

कृती :
१. सर्वात आधी सुरमई माशाचे तुकडे कापून स्वच्छ धुवून घ्या.

२. त्यानंतर स्टीमर मध्ये मासे 7 ते 8 मिनटं वाफवून घ्या.

३. मासे वाफवल्या नंतर त्याचे काटे (bone)नीट काढून घ्या, आणि मासे कुस्करून घ्या,त्याचे चँक्स असू द्या, जास्त कुस्करायचे नाही.

४. आता माशाच्या चँक्स मध्ये उकडून कुस्करलेलं बटाटे, ब्रेड क्रम व इतर सर्व मसाले आणि मीठ घालून मिक्स करून घ्या

५.आता या मिश्रणाचा घट्ट गोळा मळून घ्या

६. आता या मिश्रणाला कटलेट चा आकार द्या आणि बाजूला ठेवा.

७. आता तयार कटलेट अंड्याच्या व त्या नंतर ब्रेड क्रम मध्ये घोळवून बाजूला ठेवा.

८. आणि तयार कटलेट पॅन मध्ये कमी आचेवर आणि कमी तेलात श्यालो फ्राय करून घ्या.

९. आपले गरमागरम कटलेट तयार आहेत, चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Surmai cutlet recipe in Marathi news updates.

Special Recipe | झणझणीत सुरमई माश्याच कटलेट – पहा रेसिपी