27 April 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

राज कुंद्राची अटक योग्यच | मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

Raj Kundra

मुंबई, ०७ ऑगस्ट | पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

शर्लिन चोप्राची आठ तास चौकशी:
पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राची मुंबई पोलिसांकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्री चौकशीनंतर तिला सोडण्यात आले. तर गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचीही शक्यता आहे. उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा हिचेदेखील काही लिंक लागत असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने तिची तब्बल आठ तास चौकशी केली. शर्लिन चोप्रा हिला आर्म्स प्राईमसोबत असणाऱ्या संबंधित संदर्भात विचारण्यात आले. त्याचे नियम व अटी शर्ती काय आहेत? यासंदर्भात विचारण्यात आले. तसेच तुम्ही किती व्हिडिओ शूट केले आहेत. त्याच्याकडे प्रॉडक्शनचे भागीदार कोण आहेत? याबाबतही शर्लिनला विचारणा करण्यात आली.

19 जुलैपासून पोलिसांच्या तावडीत राज कुंद्रा:
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी त्याच्या घरातून अटक केली होती. तेव्हापासूनच तो कैदेत आहे. कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीला सोबत ठेवून दोघांची समोरासमोर चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. परंतु, शिल्पाचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे पुरावे अद्याप पोलिसांकडे नाहीत. त्यामुळेच शिल्पाला या प्रकरणापासून दूर ठेवण्यात आले आहे. शिल्पाने आतापर्यंत टाकलेले पतीचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. आता आणखी एका जामीन अर्जावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai high court dismisses Raj Kundra’s plea over challenging his remand order in porn racket case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x