3 May 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Special Recipe | कुरकुरीत पिझ्झा ब्रेड रोल घरच्याघरी बनवा - पहा रेसिपी

Pizza bread roll recipe in Marathi

मुंबई ९ ऑगस्ट | वीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे.

साहित्य :
* 8 ब्रेड सलाइस
* 2 लाल सिमला मिरची
* 1 हिरवी सिमला मिरची
* 2 पिवळी सिमला मिरची
* 1 कांदा
* 1 टोमॅटो
* 1 वाटी किसलेलं चीज
* 1 टेबलस्पून पिझ्झा सॉस
* चिली फ्लेक्स चवीनुसार
* मिक्स हर्बसं चवीनुसार
* काळी मिरी पूड चवीनुसार
* मीठ चवीनुसार
* 2 टेबलस्पून बटर
* तेल
* 2 वाटी पाणी

कृती :
१.
सर्वप्रथम कांदा, सिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरून घ्या. चीज किसून घ्या.
२. कढईमध्ये बटर गरम करून त्यावर कांदा आणि भाज्या परतून घ्या. नंतर त्यात आवडीनुसार पिझ्झा सौस,चिली फ्लेक्स, मिक्स हर्बसं,मीठ,काळीमिरी पुड घाला. आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो मिक्स करा. टोमॅटो भाज्यांमध्ये तीन ते चार सेकंद परतून झाले की एका प्लेटमध्ये भाज्या काढून घ्या.
३. भाज्या थोड्या थंड झाला की त्यावर किसलेले चीज घाला. ब्रेडच्या कडा काढून ब्रेड पाण्यात थोडासा बुडवून हाताने ब्रेडला दाबत ब्रेड मधील एक्स्ट्रा चा पाणी काढून घ्या. आणि ब्रेड मध्ये भाज्यांचे सारण भरून ब्रेड रोल तयार करून घ्या.
४. तयार ब्रेड रोड गरम तेलात छान लालसर होईपर्यंत डीप फ्राय करून घ्या.
५. गरम गरम पिझ्झा ब्रेड रोल टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

News Title: Pizza bread roll recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x