6 May 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात, त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतील - जयंत पाटील

Minister Jayant Patil

सांगली, १५ ऑगस्ट | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राज्यात जातीयवादी राजकारण वाढल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, काही लोक काहीतरी बोलून केवळ लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करीत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. सांगली येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करतात:
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, काही लोक काहीतरी विधान करून लोकांचे लक्ष वेधण्याचे काम करत असतात. त्याकडे राज्यातील लोक दुर्लक्ष करतील. पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत ते म्हणाले, महापुरामुळे सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे.

सरकारने गरीब कुटुंबीयांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी जशी गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले आहे, तसेच श्रीमंत कुटुंबीयांनी धान्य घेऊ नये. त्याचा लाभ एखाद्या गरीब कुटुंबाला होईल. ज्यांची शेती आहे, घरात एसी आहे, गाड्या आहेत त्यांनी धान्याचा लाभ घेऊ नये.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Jayant Patil indirectly reply to MNS Chief Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x