7 May 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

VIDEO | गजानन काळे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | आता महिला संघटना आयुक्तांकडे

Raj Thackeray

नवी मुंबई, १६ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र पोलिसांकडून आयुक्तालयाबाहेर जमावाला अडवले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

पती गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. अखेर बुधवारी रात्री काळे यांच्या पत्नीने नेरुळ पोलीस ठाण्यात पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार केली. त्यानुसार अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल करूनही काळेंना अटक न झाल्याने संतप्त महिला पोलीस आयुक्तालयासमोर धडकल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Arrest MNS leader Gajanan Kale women gathered outside Navi Mumbai Commissioner police office news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x