7 May 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

ACB Raided PCMC | पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट 'वसुली राज'वरून राजकारण तापलं

पिंपरी चिंचवड, १९ ऑगस्ट | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. एसीबीच्या या कारवाईवरुन पिंपरी-चिंचवड शहरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या वसुलीराज’वरून भाजपाला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय.

भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली (ACB action against PCMC Standing Committee Chairman over corruption allegation) :

काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची बैठक पार पडली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या कार्यालयात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली गेली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांचा समावेश आहे. पक्ष खऱ्याच्या पाठी मागे उभा राहील. जे सत्य आहे आणि ह्या प्रकरणाची पडताळणी केली जाईल. येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता काबीज करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेल्याचा आरोप भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ACB action against PCMC Standing Committee Chairman over corruption allegation news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x