3 May 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला | आता अजित पवारांची प्रतिक्रिया

DCM Ajit Pawar

पुणे, २० ऑगस्ट | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी (DCM Ajit Pawar) प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया (DCM Ajit Pawar reply on MNS chief Raj Thackeray over statement against NCP) :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. आज अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनीही राज ठाकरेंवर त्यांच्या स्टाईलमध्ये निशाणा साधला. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

पुणेरी पाट्यांची देशभरात चर्चा:
अजित पवार पुढे म्हणाले की, सध्या सोशल मीडियामुळे पुणेरी पाट्यांची देशभरात चर्चा असते. पुण्यातील गावाचे नाव, मंदिरांचे नाव हेदेखील कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरत असतो. विशेष म्हणजे पुण्यात काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदीरदेखील उभारण्यात आले होते. पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवानांही सोडल नाही असं तिथं ठिकाणांची काय कथा? असं उपमुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

संजीवनी उद्यानाचे केले भूमिपूजन:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुण्यातील संजीवन उद्यानाचे भूमिपूजन केले. पुण्यातील वारजे परिसरात वन विभागाच्या 35 एकर जागेवर हे उद्यान उभारले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार कार्यक्रमस्थळी सकाळीच दाखल झाले. कार्यक्रमाचे भूमिपूजन आटोपल्यानंतर त्यांनी हे विधान करत कार्यक्रमात एकच हशा उडाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: DCM Ajit Pawar reply on MNS chief Raj Thackeray over statement against NCP news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x