15 May 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्यपालांकडून चर्चेचं निमंत्रण | वादाचा गुंता सुटणार?

Mahavikas Aghadi

मुंबई, २१ ऑगस्ट | १२ आमदारांच्या निर्णयावरून शिवसेना आणि राज्यपालांमध्ये चांगलंच राजकारण पेटलं आहे. पण हा वाद आता निकाली निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचं निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चर्चेचं निमंत्रण (Appointment of 12 MLC on the legislative council CM Uddhav Thackeray and DCM Ajit Pawar will meet governor Bhagat Singh Koshyari) :

राज्यपालांकडून निमंत्रण:
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या चर्चेसाठी राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांच्याकडून निमंत्रण आला आहे. या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यापालांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.स्वातंत्र्यदिनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी 12 आमदारांच्या मुद्द्यावर राज्यपालांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरकारमधील नेते काही म्हणत नाहीत किंवा तसा आग्रह धरत नाही, असं राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वत: राज्यपालांकडे जाऊन याचविषयी चर्चा करणार आहे.

उपमुख्यमंत्री काल काय म्हणाले? (CM Uddhav Thackeray and DCM Ajit Pawar will meet governor Bhagat Singh Koshyari) :

बारा आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबतचा पूर्ण निर्णय राज्यपालांचा आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपालांची भेट घेणार असून याबाबतची शिफारस करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा:
सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा. अशाप्रकारे नामनिर्देशित जागा अनिश्चित काळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत. राज्यपालांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. ते कधीपर्यंत द्यावं हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असंही यावेळी हायकोर्टाने म्हटलं आहे.

या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं आहे.

कोणत्या आमदारांची शिफारस?
महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर आणि शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Appointment of 12 MLC on the legislative council CM Uddhav Thackeray and DCM Ajit Pawar will meet governor Bhagat Singh Koshyari.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x