5 May 2024 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे सत्तेत आहेत : स्वरा भास्कर

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने धक्कादायक विधान करून थेट नरेंद्र मोदींच्या सरकारवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. त्यामुळे नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ”राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे आज देशात सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार का?”, असे बेधडक विधान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केले आहे.

काल नवी दिल्लीतील आयोजित पत्रकार परिषदेत स्वराने हे धक्कादायक विधान केला आहे. तसेच स्वराने सध्या देशभरात सुरु असलेल्या कथित नक्षलवादी ‘थिंक टँक’ अटकसत्रासंदर्भात स्वराने हे विधान केले आहे, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान स्वराने इतिहासातील गोष्टींना उजाळा देत म्हटलं की, ‘आपल्या देशात जेव्हा महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याची हत्या करण्यात आली, तेव्हा काही लोक आनंद उत्सव साजरा करत होते. आज तिच लोक सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार आहोत का?. तर याचे उत्तर नाही असंच आहे. दुसरीकडे सध्या काहीही झालं की तुरुंगात टाका असे म्हटले जाते.’

दरम्यान पुढे स्वराने असं सुद्धा म्हटलं की, ‘रक्तासाठी तहानलेला समाज बनणे ही चांगली गोष्ट नाही, अशी टीकादेखील तिनं यावेळी केली. भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत, त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न अभिनेत्री स्वरा भास्करने पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला आहे. त्यामुळे स्वराच्या या टीकेला भाजप कस उत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x