5 May 2024 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

राम कदमांना आवाहन! मी मुंबईला येते, मला फक्त बोटाने स्पर्श करून दाखवा, उचलून घेऊन जाण्याची गोष्ट तर लांबच राहिली

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर महिलावर्गाकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. राम कदमांनी महिलांप्रती केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचाच प्रत्यय म्हणजे एका मराठा तरूणीने भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेंज दिल आहे.

सध्या त्या मराठा तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या भाजप आमदार राम कदमांनी एक वक्तव्य केलं होत की, ‘उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन असे बेताल वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले. त्याचाच समाचार घेत मीनाक्षी डिंबळे पाटील या तरूणीने एक व्हिडिओ पोस्ट केला.

त्यात मीनाक्षी डिंबळे पाटील या तरूणीने आमदार राम कदम यांना खुलं आवाहन दिल आहे की, ‘राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करते, मला तुम्ही मुंबईला बोलवा किंवा मी मी मुंबईत येते. आल्यानंतर मला फक्त बोटाने स्पर्श करून दाखवा, उचलून न्यायची गोष्ट तर लांबच राहिली. त्याबद्दल मी नंतर बघते. तुम्ही जे वक्तव्य ते अत्यंत लांछनास्पद आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे इथे स्त्रियांचा आदर केला जातो. स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात जागा नाही. तुम्ही जे बोलला आहात त्याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आपण आमनेसामने भेटून बोलू. तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. आता तुमच्या फोनची मी वाट बघते आहे. तुम्ही फोन करा आणि माझे चॅलेंज स्वीकारा अशीच माझी अपेक्षा आहे.” अशा शब्दात या मुलीने आपला निषेध नोंदवत भाजप आमदार राम कदम यांना समाज माध्यमांवरून खुले आव्हान दिले आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x