5 May 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
x

MPSC Updates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर | आता मुख्य परीक्षेची तयारी

MPSC Exam

मुंबई, ०७ सप्टेंबर | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 राज्यातील विविध केंद्रांवर 21 मार्चला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर, आता मुख्य परीक्षेची तयारी – MPSC declared state service preliminary exam 2020 result :

कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती. 200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आला आहे. 413 पदांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MPSC declared state service preliminary exam 2020 result.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x