5 May 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Virat Kohli Steps Down T20 World Cup Captaincy | विराट कोहली T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार

Cricketer Virat Kohli

मुंबई, १४ सप्टेंबर | टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. कारण कर्णधार विराट कोहली टी ट्वेण्टीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून याबाबतची घोषणा केली. विराट कोहली केवळ टी ट्वेण्टीची कॅप्टन्सी सोडणार आहे. तो वन डे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी कायम असेल. दोनच दिवसापूर्वी विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

विराट कोहली T20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडणार – Cricketer Virat Kohli will steps down from T20 World Cup Captaincy :

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्यक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार, असं कोहली कर्णधारपद सोडताना म्हणाला.

वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसंच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देण गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही बॅटसमन म्हणून देत राहील,” असंही कोहलीने म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Cricketer Virat Kohli will steps down from T20 World Cup Captaincy.

हॅशटॅग्स

#Virat Kohali(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x