29 April 2024 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

अमेरिकेत ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा | कोरोना वाढू लागल्याने पालकांत भिती

US Corona

वॉशिंग्टन, १७ सप्टेंबर | अमेरिकेत एकूण बाधितांपैकी एक चर्तुथांश रुग्णांत लहान मुलांचा समावेश आहे.‘अमेरिकी ॲकडेमी ऑफ पीडियाट्रिक्स ॲड द चिल्ड्रन हॉस्पिटल’च्या एका अहवालानुसार गेल्या दीड वर्षात देशातील सुमारे ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा झाली असून जुलै महिन्याचा विचार केल्यास तब्बल ७ लाख ५० हजारापेक्षा अधिक मुलांना संसर्ग झाला आहे.

अमेरिकेत ५० लाखांहून अधिक शालेय मुलांना कोरोनाची बाधा, कोरोना वाढू लागल्याने पालकांत भिती – Corona rapidly spreading in USA school students :

कोरोनाच्या सावटाखाली अमेरिकेत विद्यार्थी जुलैपासूनच शाळेत हजेरी लावत आहेत. परंतु आता लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.

मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हवेशीर जागा आणि योग्य खबरदारी असल्यास शाळेत जोखीम राहणार नाही, असे एका अभ्यासात म्हटले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोना वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. मे महिन्यात कॅलिफोर्नियाच्या मारिक कौंटीत एका शाळेत लस न घेतलेल्या एका शिक्षकामुळे २६ जणांना कोरोनाची लागण झाली. जुलै महिन्यांत दर आठवड्याला सुमारे ७२ हजार मुलांना कोरोनाची बाधा होत होती. त्यामुळे सध्या देशातील एकूण बाधितांपैकी २९ टक्के रुग्ण अल्पवयीन आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Corona rapidly spreading in USA school students.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x