27 April 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट
x

Health First | चंदनाचा टिळा आणि कपाळावरील ‘अग्न’ चक्राचे मूळ स्थान | आरोग्यदायी फायदे वाचा

Benefits of Chandan on forehead

मुंबई, १७ सप्टेंबर | चंदनाचं महत्त्व हिंदू धर्मापासून परंपरागत औषधींमध्ये सुद्धा आहे. याचे कारण असे कि, सर्व प्रकारच्या पूजा विधींमध्ये चंदनाचा तिला अत्यंत पवित्र मानला जातो. अगदी पूजा – पाठ, होम – हवन या साठी चंदनाच्या काड्या लागतातच. पण तुम्हाला माहित आहे का? चंदनाचा तिला आपल्या आरोग्याला अनेको लाभ देतो. काय? तुम्हाला हे लाभ माहित नाहीत? मग काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला याच चंदनाच्या साधारण महत्व सांगणार आहोत. जाणून घ्या कारण खालीलप्रमाणे;

चंदनाचा टिळा आणि कपाळावरील ‘अग्न’ चक्राचे मूळ स्थान, आरोग्यदायी फायदे वाचा – Benefits of putting Chandan on your forehead :

आपल्या कपाळाच्या मध्यभागी अर्थात आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ‘अग्न’ चक्राचे मूळ स्थान असते. या स्थानाला ‘तिसरा डोळा’ असे म्हणतात. अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्व आहे. कारण आपल्या शरीरातील हे एक ऊर्जा स्थान आहे. जे आपल्याला आरोग्य देते. कदाचित म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा अनेको वर्षांपासून सुरु आहे. चला जाणून घेऊयात चंदनाच्या टिळ्याचे फायदे:

एकाग्रता सुधार:
तिसरा डोळा आपली एकाग्रता केंद्रित करण्याचे काम करते. याशिवाय चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास डोकं शांत आणि मन स्थिर राहते. याचे कारण म्हणजे चंदन हे थंड प्रवृत्तीचे असते.

सकारात्मकतेत वाढ:
तिसर्‍या डोळ्याचे स्थान हे आपले अंतर्मन आणि सुविचारांचे केंद्रस्थान आहे. याशिवाय नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या स्थानाच्या माध्यमातून आपल्या शरीरात येते. मात्र, केवळ चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.

Health benefits of applying Chandan Tilak on forehead :

तणावापासून मुक्तता:
थकवा, मानसिक अस्थिरता आणि निरुत्साह यामुळे निद्रानाश होतो. परिणामी तणावाची समस्या उदभवते. आयुर्वेदानुसार कपाळावरील चंदनाचा टिळा मानसिक त्रासातून मुक्तता करण्यास मदत करतो.

डोकेदुखीवर परिणामकारक:
तिसरा डोळा हे स्थान दोन्ही भुवयांच्या मध्य शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते.

शरीरातील उष्णता कमी होते:
चंदनामध्ये आपल्या शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमता असते. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात. याशिवाय शरीरातील नसांनादेखील थंडावा मिळतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Health benefits of applying chandan (sandalwood) on your forehead.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x