6 May 2024 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

BIG BREAKING | भाजप नेते किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Anil Parab

मुंबई, २१ सप्टेंबर | भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली होती. त्यानुसार सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले होते. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. या बरोबर त्यांच्या खात्याअंतर्गत परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमैय्या यांनी केला होता.

भाजप नेते किरीट सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा – Minister Anil Parab has file 100 crore defamation suit in Bombay high court against Kirit Somaiya :

बिनशर्त जाहीर माफी मागावी.. अन्यथा:
किरीट सोमैया गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गैरव्यवहारप्रकरणी सोमैया यांनी अनेकदा शिवसेना नेत अनिल परब यांचे नाव घेतले होते. अनिल देशमुख नंतर अनिल परब आत जाणार, असा दावा अनेकदा सोमैया यांनी केला होता. परब यांच्या विरोधात त्यांनी काही पुरावेही ईडीला दिले होते. मात्र काही दिवस बॅकफुटला असणारे परब हे सोमैया विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमैया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तीन दिवसांत बिनशर्त जाहीर माफी मागावी तसेच बदनामीकारक व बिनबुडाचे आरोप करणे न थांबविल्यास 100 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशाराही परब यांनी दिला होता.

सोमैया यांनी मे २०२१ पासून प्रसिद्धिमाध्यमांमधून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ व ५०० चा भंग होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी तीन दिवसांमध्ये समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केलेला मजकूर काढून टाकावा, त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि वृत्तपत्रांमधून जाहीर माफी मागावी, अशी नोटीस परब यांच्या वतीने अँड. सुषमा सिंग यांनी बजावली होती. त्यानुसार आज भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या विरोधात अनिल परब यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Minister Anil Parab has file 100 crore defamation suit in Bombay high court against Kirit Somaiya.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x