17 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

महाविकासआघाडीचे कारभारी अपयशी | म्हणूनच पवारांना या वयात बांधावर जाण्याची वेळ

BJP MLA Gopichand Padalkar, MahaVikasAghadi, Sharad Pawar

पुणे, १८ ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहेत. त्यामुळे भरीव मदतीसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच आपण मदतीसाठी केंद्र सरकारकडे मदत मागणार असल्याचेही पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी ही माहिती दिली आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, हे संकट फार मोठं आहे. अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे. सरकारची सर्व ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावू, असं आश्वासन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे राज्यातील खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, केंद्राकडे मदतीची मागणी करणार असल्याची माहिती पवारांनी दिली. येत्या १० दिवसात आपण दिल्लीला जाणार असल्याचंही पवार म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सोलापूरच्या भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत.एकीकडे शरद पवार सत्ता असताना किंवा नसतानाही शेतकऱ्यांसाठी धावून येतात अशा शब्दांत त्याचं कौतुक केलं जात असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांवर टीकास्त्रसुद्धा सोडलं आहे.

‘शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे’अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय, शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागचा दौरादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते तेव्हाचा होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

 

News English Summary: The return rains in Maharashtra have caused huge losses to farmers. NCP President Sharad Pawar is currently on a tour to inspect the damage. Chief Minister Uddhav Thackeray will also inspect the damage in the Solapur area. On the one hand, while praising Sharad Pawar for running for the farmers whether he is in power or not, BJP MLA Gopichand Padalkar has once again targeted NCP President Sharad Pawar and MahaVikas Aghadi Government.

News English Title: BJP MLA Gopichand Padalkar criticized MahaVikasAghadi after Sharad Pawar tour of Maharashtra News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x