4 May 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Medicine If Fever Subsides | ताप गेल्यानंतर औषधे घेणे बंद करावे का ? - नक्की वाचा

Medicine Use If Fever Subsides

मुंबई, २७ सप्टेंबर | ताप आल्यावर आपण विचार न करता आपल्या मनाने गोळ्या घेतो आणि जर ताप १-२ दिवस गेला नाही तर डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर तापाच्या गोळ्यांबरोबर इतर औषधांचे डोस देतात. परंतु, एका डोस मध्ये ताप गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण करावा (Medicine Use If Fever Subsides) की नाही, हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण आपल्यापैकी अनेकजण तापाची औषधे पूर्णपणे घेत नाही. पण हे असे करणे योग्य आहे का? (हे ही वाचा – Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे ‘४’ प्रकारचे फायदे)

Can I stop taking fever medicine if I do not have fever :

Medicine-Use-If-Fever-Subsides

ताप येणे हे एक प्रकारचे इन्फेकशन आहे. म्हणून तो कमी करण्यासाठी औषधे घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेळी, योग्य औषधाचा डोस योग्य प्रमाणात घेतला तर ताप नियंत्रणात येतो. परंतु, काही वेळा ताप उतरल्यानंतरही डॉक्टर औषधांचा कोर्स पूर्ण करण्याचा सल्ला देतात. कारण लक्षणे दिसत नाहीत म्हणजे आजार नाही, असे नसते. ताप हे लक्षण असले तरी त्यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. म्हणून इन्फेकशन पूर्णपणे बरे होण्यासाठी औषधांचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे.

साधारणपणे ताप नसला तरी तापाची औषधे ५-७ दिवस घेण्याचा सल्ला दिला जातो आणि डॉक्टरांचा सल्ला पाळणे महत्त्वाचे आहे. जर ताप उतरल्यानंतर तुम्ही औषधं घेतली नाही (Medicine Use If Fever Subsides) तर बॅक्टरीयांचा प्रादुर्भाव (प्रतिकार) वाढण्याची शक्यता असते. अशावेळी जर पुन्हा तुम्हाला ताप आला तर त्याची गंभीरता वाढते. त्याचा त्रास अधिक होतो. आणि मग शरीराला इन्फेकशनशी सामना करण्यासाठी ७ ते १०-१५ दिवस अथवा ३ आठवडे वा १ महीना देखील लागू शकतात. म्हणून ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधांचा कोर्स पूर्ण करा. ही औषधे कधी आणि किती वेळा घ्यायची यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साधारणपणे तापाची औषधे जेवणानंतर किंवा काही खाल्यानंतर दिवसातून तीनदा घ्यायची असतात. जर तुम्हाला पूर्णपणे बरे वाटत असेल आणि तुम्ही औषध घेणे बंद करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण स्वतःच्या मनाने औषधे घेणे, बंद करणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Is it necessary to take medicine if the fever subsides.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x