3 May 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Babu George Valavi | 1978 मध्ये खरेदी केलेले 3500 शेअर्स | आज किंमत 1,448 कोटी | पण दुर्दैव पहा

Babu George Valavi

मुंबई, २८ सप्टेंबर | छप्पर फाडून मिळते ते असे. ४३ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ३,५०० शेअर्सचा केरळच्या काेची येथील बाबू जॉर्ज वालावी (Babu George Valavi) यांना विसर पडला. आता त्याची किंमत १,४४८ काेटी रुपये आहे. पण कंपनीला आता त्यांचे पैसे द्यायचे नाहीत. ७४ वर्षांचे बाबू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हे प्रकरण सेबी कडे नेले आहे. ते कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक आहेत आणि कंपनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्याला सेबीकडून नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा बाबू व्यक्त करत आहेत.

Babu George Valavi was Bought Shares 43 Years Ago Now Worth Rs 1448 Crore, But Company Rejects Investor’s Claim :

दावा- कंपनी नाेंदणीकृत नव्हती, लाभांश देत नव्हती:
बाबू यांनी १९७८ मध्ये मेवाड आॅइल अँड जनरल मिल्स लिमिटेडचे ३,५०० समभाग खरेदी केले हाेते. त्या वेळी ही राजस्थानच्या उदयपूरमधील एक अनाेंदणीकृत कंपनी हाेती. बाबू २.८ % भागधारक बनले. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पी. पी. सिंघल व बाबू मित्र होते. कंपनी नाेंदणीकृत नव्हती व कोणताही लाभांश देत नव्हती त्यामुळे या कुटुंबाला या गुंतवणुकीचा विसर पडला. २०१५ मध्ये त्यांना या गुंतवणुकीची आठवण झाली व त्यांची चाैकशी केली असता त्यांना कळले की कंपनीने आपले नाव बदलून पीआय इंडस्ट्रीज केले आहे व ती सूचीबद्ध झाली. बाबूने शेअर्स डीमॅट खात्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत एका एजन्सीशी संपर्क साधला. तिने बाबूला कंपनीशी संपर्क करण्यास सांगितले. कंपनीने बाबूंना सांगितले की ते कंपनीचा हिस्सेदार नाहीत व त्यांच्या शेअर्सची १९८९ मध्ये अन्य काेणाला तरी विक्री केली.

कंपनीचा तपास, सर्व कागदपत्रे खरी असल्याचे मानले:
पीआय इंडस्ट्रीजने बनावट शेअर्सचा वापर करून त्याचे शेअर्स दुसऱ्याला बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचा आराेप बाबू यांनी केला आहे. २०१६ मध्ये पीआय इंडस्ट्रीजने बाबूला मध्यस्थीसाठी दिल्लीला बोलावले, पण बाबूने नकार दिला. नंतर कंपनीने बाबूच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना केरळला पाठवले. बाबूसोबत असलेली कागदपत्रे खरी असल्याचे कंपनीने मान्य केले, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.बाबूने सेबीकडे तक्रार केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Babu George Valavi was Bought Shares 43 Years Ago Now Worth rupees 1448 Crore.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x