29 April 2024 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

IIFL Wealth Hurun India Rich List 2021 | २०२१ मध्येही सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी टॉप

IIFL Wealth Hurun India Rich list 2021

बंगळुरू, ३० सप्टेंबर | IIFL Wealth Hurun India Rich list 2021‘ने जाहीर केलेल्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी यावेळीसुद्धा पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यापाठोपाठ मित्तल, दिलीप सांगवी, कुमार मंगलम बिर्ला आणि शिव नादर ही नावे आहेत.

Gautam Adani & family made the highest Rs 1,002 crore per day, making them the second richest family as per the IIFL Wealth Hurun India Rich List 2021 at Rs 5.05 lakh crore :

१: मुकेश अंबानी:
गेली दहा वर्ष मुकेश अंबानी हेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे पद भूषवत आहेत. त्यांची एकूण संपत्ती ७ लाख १८ हजार कोटी रुपये एवढी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील अशी पहिली रिटेल आणि टेलिकॉम ऑपरेशन कंपनी आहे, जिने २०० बिलियन डॉलर्सचे भांडवल पार केले आहे.

२: गौतम अदानी:
गौतम अदानी अँड फॅमिली यांनी ५ लाख ५ हजार ९०० कोटींच्या संपत्तीसह या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. अदानी ग्रुपचे मार्केट कॅपिटल हे ९ लाख कोटी रुपये इतके आहे.

३: शिव नादर:
HCL कंपनीचे शिव नादर हे तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. कोरोना काळात ट्रॅव्हल, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांवर झालेल्या परिणामांमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये 67 टक्के वाढ झाली आहे. २३६६०० कोटी रुपये एवढी संपत्ती असलेली HCL कंपनी ही तिसरी अशी भारतीय आयटी कंपनी आहे जिने US १० बिलियन डॉलर्सचा रेवेन्यू पार केला आहे.

४: एस पी हिंदुजा आणि फॅमिली:
हिंदजजा फॅमिली २ क्रमांक खाली उतरून चौथ्या क्रमांकावर आली आहे. हिंदूजा फॅमिलीचे उत्पन्न ५३ टक्क्यांनी वाढून 2 लाख 20 हजार कोटी रुपये इतके झाले आहे.

५: लक्ष्मी मित्तल:
लक्ष्मी मित्तल यावेळी ८व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आले आहेत. त्यांची संपत्ती १७४४०० कोटी इतकी आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा, नूतनीकरण तसेच ऊर्जा क्षेत्राकडून असलेल्या प्रचंड मागणीमुळे मित्तल यांच्या शेअर्सच्या किमतीत तिप्पट वाढ झालेली आहे.

६: सायरस पूनावला:
सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांनी या यादीमध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. ६० कोटी लसिंचे डोस उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये ७४% वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती १ लाख ६३ हजार ७०० कोटी रुपये इतकी आहे.

७: राधाकृष्ण दमानी:
१५४३०० कोटीच्या संपत्तीचे मालक अवेन्यू सुपरमर्टसचे राधाकृष्ण दमानी यांनी या यादीमध्ये सातवा क्रमांक पटकावला आहे.

८: विनोद शांतीलाल अदानी:
१३१६०० कोटी संपत्ती असलेले विनोद शांतीलाल अदानी अँड फॅमिली हे बाराव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर आले आहेत.

९: कुमार मंगलंम बिरला:
आदित्य बिरला ग्रुपचे कुमार मंगलम बिरला यांची संपत्ती १२२२०० कोटी रुपये इतकी आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कॅपिटल मध्ये ८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१०: जय चौधरी:
या यादीच्या दहाव्या क्रमांकावर क्लाऊड सिक्युरिटी ‘zscaler’ कंपनीचे मालक जय चौधरी आहेत. त्यांची संपत्ती २८१००० कोटी रुपये इतकी आहे. सायबर सेक्युरिटी सर्विसेस मधील वाढत्या मागणीमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये ८५ टक्के वाढ झालेली आहे आणि त्यांनी दहावा क्रमांक पटकावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IIFL Wealth Hurun India Rich list 2021 Mukesh Ambani on top in India.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x