27 April 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

आगामी निवडणुकीची व्युहरचना निश्चित करण्यासाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीची तयारी तसेच भाजप पक्ष संघटन बळकट करण्यासाठी भाजप तयारीला लागली आहे. त्या अनुषंगाने येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबरला दादर येथील वसंत शारदा येथे होणा-या बैठकीला भाजपाचे सर्व नेते, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असं मुंबई भाजपने स्पष्ट केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने ही बैठक असल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा प्रभारी, जिल्हाध्यक्ष प्रदेशाचे अध्यक्ष, लोकसभा क्षेत्राचा आढावा घेण्याचे पक्षाने सुनिश्चित केलं आहे. त्यामुळे पक्षाकडून कोणती तयारी सुरु आहे याचा संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे. यावेळीच मुंबईतील लोकसभा निवडणूकीची व्यूहरचना निश्चित केली जाणार आहे.

मुंबई भाजपच्या या महत्वाच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रातील महत्वाचे नेते हजेरी लावणार असल्याचे समजते. दरम्यान, या बैठकीच्या समारोपाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मार्गदर्शन करतील, अशी अधिकृत माहिती भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x