29 April 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

MAHA TET Exam 2021 Postponed | राज्य टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली | ही आहे नवी तारीख

MAHA TET Exam 2021 Postponed

मुंबई, 22 ऑक्टोबर | राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणार ही परीक्षा आता दिवाळीनंतर घेतली जाणार (MAHA TET Exam 2021 Postponed) आहे. परीक्षेची सुधारीत तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे.

MAHA TET Exam 2021 Postponed. The Teacher Eligibility Test (TET) has been postponed for the third time in a row in the state. The exam, which will be held on October 30, will now be held after Diwali. Maharashtra State Examination Council has announced the revised date of the examination :

राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी टीईटी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल केला आहे. पोट निवडणुकीमुळे परीक्षेच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणुकीमुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ३१ ऑक्टोबरला राज्याच्या आरोग्य विभागाची परीक्षा ठेवण्यात आली. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल केला. ३१ ऑक्टोबर ऐवजी ३० ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, त्याच दिवशी पोटनिवडणूक असल्यानं परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता टीईटी परीक्षा दिवाळीनंतर म्हणजेच २१ नोव्हेंबरला होणार असून, तसं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलं आहे. राज्यातून ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवार टीईटी परीक्षा देणार आहेत. राज्यात 5 हजार परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MAHA TET Exam 2021 Postponed third time in a row in the state.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x