21 March 2023 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण? Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...? Children Mobile Addiction | मोबाइलचे व्यसन मुलांसाठी खूप धोकादायक, फॉलो करा या टिप्स, मुले स्वत: सोडून देतील मोबाईल Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम? IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
x

अंकिताने दुसऱ्यासोबत साखरपुडा केला | सुशांतच्या निधनानंतर त्याची विधवा बनल्याचे ढोंग करतेय

Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty, Anikita Lokhande

मुंबई, २८ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सुशांत सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता सुशांतची कथित एक्सगर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने समोर येऊन संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या परिवाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रियानं सुशांत आणि त्याच्या नैराश्याबद्दल उघडपणे वक्तव्य केलं आहे. सुशांत तनावत होता शिवाय त्याची आईही नैराश्यग्रस्त होती असा खुलासा रियानं केला आहे.

रिया म्हणाली की, सुशांत आईच्या खूप जवळ होता. तो नेहमी आईची आठवण काढत असे. सुशांतचे आपल्या वडिलांसबोतचं नातं व्यवस्थित नव्हतं. कारण तरुणपणात वडील सुशांतच्या आईला सोडून गेले होते. रिया असेही म्हणाली की, सुशांतची आई नैराश्यानं त्रस्त होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यामुळे जवळपास पाच वर्षे सुशांत वडिलांसोबत बोलत नव्हता.

तसेच गेल्या चार वर्षांपासून सुशांत आणि अंकिता संपर्कात नव्हते, असे असताना अंकिता अचानक त्याच्याबद्दल का बोलतेय, असा प्रश्न रियाने उपस्थित केला आहे. रिया म्हणाली की सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याची विधवा बनल्याचे ढोंग करतेय जिथे ती स्वतः दुसऱ्यासोबत साखरपुडा करून बसली आहे.अंकिता देखील अनेक खोट्या अफवा पसरवते आहे. सुशांतच्या घरात राहून तिने कोणत्या घराचे कागदपत्रे दाखवले आहेत, असे म्हणत तिने तिच्यावर निशाणा साधला आहे. तसेच माझ्यावर सुशांतच्या पैशांवर ताबा मिळवण्याचे आरोप केले जात आहेत, तसे असते तर सुशांत अजूनही अंकिता राहत असेलल्या घराचे हफ्ते भरत होता, ते पहिल्यांदा थांबवले असते. अंकितानं सुशांतवर प्रेम केले होते, मी देखील त्याच्यावर प्रेम केले, या परिस्थितीत तिने माझे दु:ख समजून घ्यायला हवे होते, असे देखील रियाने म्हटले आहे.

 

News English Summary: Rhea further questioned how Ankita is pretending to be Sushant’s widow even though she is engaged to someone else. She even questioned how Ankita went onto date Sushant’s friend post her break up. She even raised doubts about Ankita saying that Sushant called her a year back and claimed that Rhea was harassing him.

News English Title: Pretends to be Sushants widow and on the other hand Rhea Chakraborty counters Ankita Lokhande News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x