2 May 2025 6:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

विरारमध्ये ICICI बँकेच्या माजी मॅनेजरकडून बँक लुटण्यासाठी हल्ला | हल्ल्यात महिला मॅनेजरचा मृत्यू

ICICI Bank

विरार, ३० जुलै | विरार पूर्व परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेत गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. याला विरोध करताना बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मॅनेजर योगीता वर्तक यांचा मृत्यू झाला असून, कॅशियर श्वेता देवरूख जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी कॅशियरवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेची विरार पूर्वेला मनवेल पाडा येथे शाखा आहे. घटना रात्री आठ वाजता घडल्याने बँकमधील इतर सर्व कर्मचारी घरी गेले होते. परंतु, यावेळी बँक व्यवस्थापक श्वेता देवरुख (32) आणि योगिता वर्तक (34) बँकेत काम करत होते. दरम्यान, बँकेचे माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत घूसून रोख आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

संध्याकाळी बँक बंद होण्याच्या सुमारास हा लुटीचा प्रकार घडला. बँकेच्याच माजी मॅनेजरने बँक लुटण्याचा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार घडला त्यावेळी बहुतांश कर्मचारी घरी गेले होते. अनिल दुबे असे त्या माजी मॅनेजरचे नाव आहे. या घटनेनंतर दुबे पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ex ICICI Bank manager attempt to rob in Virar branch news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या