लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलन प्रकरणी फरार दीप सिद्धूला अटक

नवी दिल्ली, ०९ फेब्रुवारी: प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.
Delhi Police have arrested Deep Sidhu, an accused in 26th January violence case.
(Picture taken after arrest; source: Delhi Police) pic.twitter.com/RBLYbrGfik
— ANI (@ANI) February 9, 2021
दरम्यान, लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धूने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. “दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” असं शेतकरी नेते गुरनाम सिंह चाडूनी यांनी घटनेनंतर म्हटलं होतं. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं होतं.
दीप सिद्धूसह जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्या अटकेसाठी त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या जाजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इकबाल सिंघ यांच्या अटकेसाठी प्रत्येकी 50,000 रुपये रोख रक्कमेची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी दीप सिद्धूचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये त्याने भाजपा खासदार सनी देओल याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता.
News English Summary: Delhi Police has launched a major crackdown on the Red Fort violence on Republic Day. Actor Deep Sidhu has been arrested by the police for allegedly inciting protesting farmers and taking them to the Red Fort. Deep Sidhu’s name came to the fore after the violence. He was also accused by farmer leaders. He had absconded after being charged. Sidhu has been arrested after 14 days.
News English Title: Lal Killa Violence Deep Sidhu An Accused In 26th January Violence Case Arrested news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL